Home »News

वापराविना असलेल्या यूएसजी मशीनविरोधात पीसी-पीएनडीटी समिती करणार कारवाई

 

फेब्रुवारी ०६,२०१९

माघ १७, १९४०

         

          उत्तर गोवा जिल्ह्यातील बंद झालेल्या इस्पितळामध्ये पडून असलेल्या यूएसजी मशिनरीचा परवाना रद्द करण्याचा निर्णय,  प्रसूतीपूर्व लिंगनिदान प्रतिबंध कायदा, १९९४ (पीसी-पीएनडीटी) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या उत्तर गोव्यासाठीच्या सल्लागार समितीच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

          यूएसजी मशिनरीचा वापर लिंगनिदान चाचणीसाठी करण्यात आलेला नाही याची खात्री करण्यासाठी अशा इस्पितळांना समितीने जारी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याप्रकरणी नोटीस बजावण्याचा व पुढील कारवाई करण्याचा निर्णय यावेळी समितीने घेतला. इस्पितळे बंद असल्याने त्यांच्या संबंधित अधिकार्‍यासोबत करण्यात आलेला पत्रव्यवहार त्यांच्यापर्यत पोहचू शकला नाही, यावरही समितीने चर्चा केली.

          अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. विकास एस.एन. गावणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत त्यांनी, पीसी - पीएनडीटी कायद्याविषयी जागरूकता करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे या विषयावर भर दिला. उत्तर गोव्यातील सीमावर्ती भागात लिंगनिदान चाचणी केली जात नाही याची खात्री करण्यासाठी अशा भागांत अचानक भेटी देणे, असेही ठरविण्यात आले.

          याशिवाय, ऑपरेटर वाढविणे, ऑपरेटर कमी करणे, यूएसजी मशीन स्थापन करणे व स्थानांतर करणे अशा बाबतीत आलेल्या अर्जांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सदस्य सचिव डॉ. महेंद्र घाणेकर, सदस्य डॉ. ए. जी. के. धाकणकर, सहायक सरकारी वकील श्रीमती. अर्चना भोबे उपस्थित होते.

 

मा/वाप/एनएन/जॉआ/अगां/२०१९/४१

TOP