Home »News

३० व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह – 2019 चे उद्घाटन

       फेब्रुवारी ०४,२०१९

माघ १५, १९४०

         

          जर तुम्हाला वाहतूक नियमांचे पालन करायचे नाही तर तसे म्हणा परंतु ट्रफिक सेंटीनलना दोष देऊ नका. वाहतूक नियमांचे उल्लघन रोखण्यासाठी ट्रफिक सेंटीनल योजनेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. २०१७ मध्ये ३३३ रस्ता अपघातामुळे दर आठवड्याला सरासरी ५ मृत्यू झाले आहेत.  आम्ही शिक्षण, कायद्याची अंमलबजावणी, आपत्कालीन अपघात सेवा, आणि सुसज्ज रस्ते या चार तत्त्वांचा वापर केला तर ही अपघातांची संख्या कमी करू शकतो”,  असे पोलीस महासंचालक श्री. मुक्तेश चंदर आयपीएस यांनी म्हटले.  ते फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात ३० व्या राष्ट्रीय सुरक्षा              सप्ताह – 2019 चे उद्घाटनावेळी मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

          यावेळी वाहतूक खात्याचे संचालक श्री. निखिल देसाई, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृपाशंकर एम. एस., गोवा ऑटोमोबाईल डिलर्सचे अध्यक्ष   श्री. प्रशांत जोशी आणि कदंबा परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक                श्री डॅरिक परेरा उपस्थित होते.  

          यावेळी बोलताना डॉ. चंदर यांनी, लोकांना आसएसआय चिन्ह असलेले हॅलमेट वापरण्याचे आवाहन केले. हेल्मेट घालण्यापुरतेच नव्हे तर ते घातल्यानंतर सारखे लॉक करणे अनिवार्य आहे. पाठीमागे बसलेल्यानेसुध्दा आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेट घातले पाहिजे. तुम्हाला चलन मिळेल म्हणून हेल्मेट घालू नका तर तुमच्या आणि दुसर्‍याच्या सुरक्षेसाठी घाला. अतिवेगाने चालविणे, दारू पिऊन चालविणे सुध्दा तितकेच धोक्याचे असतेअसे ते म्हणाले.

          आम्ही कायद्याचे पालन करीत आहोत. रस्ता सुरक्षतेबाबत उपदेश देणे मी कधीच थांबणार नाही आणि यामध्ये मी एक दिवस यशस्वी होऊ याचा मला विश्वास आहे,असे डॉ. चंदर म्हणाले.

          त्यापूर्वी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. श्री. निखिल देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ पाळण्यामागे  स्थानिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागृती करणे हेच ध्येय आहे असे सांगितले. तसेच अभ्यासक्रमात ‘रस्ता सुरक्षा’ विषयाचा समावेश करणारे गोवा हे पहिले राज्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

          यावेळी रस्ता सुरक्षेवरील पोस्टर्स मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. रस्ता सुरक्षेचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल शिक्षण संचालनालय, वाहतूक आणि ट्रॅफिक यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी श्री. विक्रमादित्य पणशीकर, श्री. संजय देसाई, श्री. दिलीप

 

नाईक, श्री. वासुदेव पागी, नेव्हल ड्रायव्हिंग स्कूल आयएनएस मांडवी, मारूती ड्रायव्हिंग स्कूल, चौगुले इंडस्ट्रीज फातोर्डा आणि गुरूकूल ड्रायव्हिंग स्कूल माशेल यांना त्यांच्या कार्याबद्दल गौरविण्यात आले.

          यावेळी वाहतूक सेलचे कर्मचारी श्री. सय्यद अश्रफ, श्रीमती. शर्मिला तारी आणि होमगार्डचे श्री. इनासियो डायस, मोटर वाहन निरिक्षक श्री. मिनेश तार आणि सहायक मोटर वाहन निरिक्षक श्री. चार्लस फेरिया, श्री. आनंद देसाई , श्री. गंधेश देसाई, श्री. भावेश, श्री. कल्पेश फळदेसाई आणि श्री. श्रीनिवास म्हामय कामत यांना रस्ता सुरक्षा प्रशिक्षणातील त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी सन्मानित करण्यात आले.

          या सोहळ्यानंतर माजी वाहतूक संचालक श्री. अरूण देसाई, आयएएस, यांचे ब्रीजभाषण झाले व परेश परब यांचा हास्यविनोदाचा कार्यक्रम झाला. श्री. जे. डिसोझा यांनी सूत्रसंचालन केल तर डॉ. कृपाशंकर एम.एस. यांनी आभार मानले.

 

मा/वाप/एनएन/जॉआ/अगा/२०१९/३९

 


TOP