Home »News

कामगार व रोजगार कार्डची सुरूवात

       फेब्रुवारी ०४,२०१९

माघ १५, १९४०

         

          कामगार, माहिती व तंत्रज्ञान आणि महसूल मंत्री श्री. रोहन खंवटे यांनी आज सचिवालयात कामगार व रोजगार (एल आणि ई) कार्डचा शुभारंभ केला. राज्यातील प्रत्येक काम करणार्‍या आणि बेरोजगार नागरिकांसाठी हे सामान्य ओळखपत्र असेल. यावेळी कामगार आणि रोजगार आयुक्त श्री. जयंत तारी उपस्थित होते.

कार्डचे फायदे सांगताना, श्री. खंवटे यांनी सांगितले की, हे कार्ड गोव्यातील प्रत्येक नागरीकाच्या रोजगाराच्या मागील माहितीशी जोडेले जाईल जेणेकरून त्यांच्या कौशल्याच्या आणि कामाच्या अनुभवांवर आधारीत रोजगाराच्या संधी त्यांना प्राप्त होतील.

          मंत्र्यानी सांगितले की, रोजगार खात्याने आता रोजगार कार्ड नोंदणी प्रक्रीया ऑनलाईन सुरू केली आहे. विद्यमान वैध रोजगार कार्ड २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत चालू असेल. गोव्यातील रोजगार विनिमयातील नोंदणीकर्त्यांची सगळी माहिती ऑनलाईन पोर्टलवर स्थलांतरित केलेली आहे आणि ती नोंदणीकर्त्याने आपल्या वैध रोजगार कार्डच्या क्रमांकाने २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत सक्रीय करणे आवश्यक आहे.

          कार्डसाठी स्वत: नोदणी करणार्‍यांनी www.goaonline.gov.in वर भेट द्यावी. ही माहिती नॅशनल करिअर सिस्टीम (एनसीएस) आणि आधार कार्डशी जोडली जाईल.

 

मा/वाप/एनएन/जॉआ/अगा/२०१९/३७

TOP