Home »News

सत्तरीत अंगणवाडी केंद्रांचे उद्या उद्घाटन

फेब्रुवारी ०१,२०१९

माघ १२, १९४०

सत्तरी तालुक्यातल्या खोतोडे, पणसुले मार्ले आणि ठाणे डोंगुर्ली येथे नवीन बांधण्यात आलेल्या अंगणवाडी केंद्रांचे उद्या ०२ फेब्रुवारी २०१९ रोजी उद्घाटन होईल. सकाळी १०.०० वाजल्यापासून उद्घाटन कार्यक्रमाला सुरुवात होईल. गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्या दूरदृष्टीच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि पर्येचे आमदार श्री. प्रतापसिंह राणे आणि आरोग्य, कौशल्य विकास आणि महिला आणि बाल विकास खात्याचे मंत्री श्री. विश्वजीत राणे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थित होईल.

मा/वाप/एनएन/जॉआ/मागा/२०१९/३२

TOP