Home »News

सांस्कृतिक प्रज्ञाशोध स्पर्धेचे बक्षिस वितरण शनिवारी

जानेवारी ३१,२०१९

माघ ११, १९४०

गोवा राज्य कला आणि संस्कृती संचालनालयाने आयोजित केलेल्या २०१८-१९ वर्षाच्या राज्यस्तरीय सांस्कृतिक प्रज्ञाशोध स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा २ फेब्रुवारी २०१९ रोजी संस्कृती भवन, पाटो पणजी येथे होणार आहे. २६ विविध कला प्रकारामधून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. संगीत, नृत्य, नाटक, फाईन आर्ट, साहित्य इत्यादी क्षेत्रात आगामी प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्याच्या ध्येयाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

पाटो पणजी येथील संस्कृती भवनच्या लेक्चर सभागृहात कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री श्री. गोविंद गावडे यांच्या हस्ते पुरस्कार दिले जातील.

भारतीय शास्त्रीय संगीत, तबला, संवादिनी, कथ्थक, भरत नाट्यम, एकपात्री अभिनय, गीटार, कि बोर्ड, सितार, व्हायोलिन, ड्रम, कविता, निबंध लेखन, इंग्रजी आणि मराठी हस्तलेखन आणि चित्रकला या विविध क्षेत्रात स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक क्षेत्रात रु.३०००/-, रु.२०००/- आणि रु.१५००/- आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असेल. राज्यस्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यी शिष्यवृत्ती घेण्यास पात्र ठरेल.

मा/वाप/एनएन/जॉआ/मागा/२०१९/२६

 

TOP