Home »News

औषधी वनस्पती लावण्यासाठी सबसिडी

जानेवारी ३०,२०१९

माघ १०, १९४०

कोकम (गार्सिनिया इन्डीका), पिंपळी (पायपर लॉगम) आणि मधुकरी (स्टेविया रेबावदियाना) अश्या औषधी वनस्पत्या त्यांच्या जमिनीत लावण्यासाठी सबसिडी अनुदानासाठी  पात्र शेतकर्‍यांकडून नामांकने मागविली आहेत.

राष्ट्रीय आयुष मिशनच्या नियमानुसार पात्रता निकषपूर्ण करणार्‍या इच्छूक शेतकर्‍यांनी १५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत राज्य औषधी वनस्पती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपवनपाल संशोधन आणि उपयोगिता विभाग कार्यालय, आकें मडगाव येथे  आपली नामांकने पाठवावी.

अधिक माहितीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी-राज्य औषधी वनस्पती मंडळ, मडगाव आकें येथील संशोधन आणि उपयोगिता विभागाच्या वन उप-संरक्षक कार्यालयात किंवा ई-मेल dcfru-forest.goa@nic.in किंवा ०८३२-२७५००९९ या दूरध्वनीवर संपर्क करावा.

मा/वाप/एनएन/जॉआ/मागा/२०१९/२३

 

TOP