Home »News

आवश्यक वस्तूंचा किरकोळ बाजारभाव

जानेवारी ३०,२०१९

माघ १०, १९४०

२५ जानेवारी २०१९ रोजी संपण्यात आलेल्या आठवड्यात पणजी, मडगाव, म्हापसा आणि वास्कोमधील महत्वाच्या आवश्यक वस्तूंचे दर सहकारी संस्थेच्या निबंधकाद्वारे पुढील प्रमाणे सूचित करण्यात आले आहेत.

या आठवड्यात स्थानिक उकडा तांदूळ, बाहेरील उकडा तांदूळ, सुरय तांदूळ सुपर फाईन, सुरय फाईन, सामान्य सुरय तांदूळ आणि गुळ फाईनचा दर बाजारात स्थिर होता. म्हापसा येथे एस-३० साखर रु. १/- प्रति किलो वाढली परंतू इतर बाजारात स्थिर होती.

आठवड्यात तूरडाळ बार्शी, मूगडाळ, उडीदडाळ, चणाडाळ, मसूरडाळ, वाटाणा आणि मोठा काबूलीचा दर बाजारात स्थिर होता.

आठवड्यात सनफ्लावर तेल, खोबरेल तेल आणि १ लिटिरचे डालडावनस्पती तेलाचा दर बाजारात स्थिर होता.

आठवड्यात वालपापडी, कोबी आणि हिरव्या मिरचांचा दर बाजारात खालील प्रमाणे स्थिर होता. वास्कोत बटाटा रु. ५/- प्रति किलो कमी झाला तर इतर बाजारात त्याचा स्थिर होता. पणजीत कांद्याचा दर रु. २/- ते ५/- प्रति किलो कमी झाला तर इतर बाजारात तो स्थिर होता. पणजी, म्हापसा आणि वास्कोत टॉमेटॉचा दर रु. ५/- ते रु.१०/- आणि रु.५/- इतका कमी झाला तर मडगावात तो रु. ५/- ते रु.१०/- प्रति किलो वाढला. म्हापशात वालपापडीचा दर रु. १०/- ते रु.२०/- इतका कमी झाला तर इतर बाजारात तो स्थिर होता.

मडगावात १०० भारती नारळांचा दर  रु. १/- प्रति नारळ कमी झाला तर इतर बाजारात तो स्थिर होता. १२० भारती, १५० भारती आणि १८० भारती नारळांचा दर सर्व बाजारात स्थिर होता.

मा/वाप/एनएन/जॉआ/मागा/२०१९/२२

TOP