Home »News

हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहिली

जानेवारी ३०,२०१९

माघ १०, १९४०

पणजी येथील आजाद मैदानावर आज गोव्याच्या राज्यपाल श्रीमती. मृदुला सिन्हा यांनी हुतात्मा स्मारकांवर श्रध्दांजली वाहिली. राज्यपालानी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहिली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री श्री. रामकृष्ण ढवळीकर, आयटी, महसूल मंत्री श्री. रोहन खंवटे, डीजीपी डॉ. मुक्तेश चंदर, आयपीएस, उत्तर जिल्हाधिकारी श्री. लेविन्सन मार्टिन्स, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. विकास गावणेकर, शिक्षण सचिव, आयएएस श्रीमती. निला मोहनन, आयएएस अधिकारी         श्री. अमेया अभ्यंकर, राज्यपालाचे सचिव आयएएस श्री. रुपेश कुमार ठाकूर यांनी देखील श्रध्दांजली वाहिली.

यावेळी मडगावच्या १८ जून क्रांति दिन समितीचे स्वातंत्र्य सैनिक श्री. विनायक मोर्डेकर, श्री. गोपाळ चितारी, श्री. अविनाश शिरोडकर आणि गोवा स्वातंत्र्य सैनिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री. पांडुरंग कुंकळ्ळीकर, खजिनदार श्री. औदुंबर शिंक्रे, सचिव श्री. वामन प्रभुगांवकर, सदस्य श्री. श्रीधर वेरेकर उपस्थित होते.

देशासाठी आपल्या जीवनाचा त्याग केलेल्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटाची शांतता पाळण्यात आली. नंतर बाल भवनच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.

या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या झाली होती आणि देशासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग केलेल्यांच्या स्मरणार्थ हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो.

मा/वाप/एनएन/जॉआ/मागा/२०१९/२१

TOP