Home »News

संस्कृती भवनात सॉस्पेसो आर्ट कार्यशाळा

जानेवारी ३०,२०१९

माघ १०, १९४०

कला आणि संस्कृती संचालनालयाद्वारे दरवर्षी संगीत, लोककला, चित्रकला या क्षेत्रात अनेक कार्यशाळा आयोजित केल्या जातात. पहिल्यांदाच या संचालनालयातर्फे इटलीतील प्रसिध्द कलाकार मोनिका आलेग्रो यांनी शोध लावलेल्या आणि जगभरातील अनेक कलाकार वापरत असलेल्या सोस्पेसो आर्टची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

कला आणि संस्कृती खात्याचे उप-संचालक श्री. अशोक परब, कार्यशाळा मार्गदर्शक   श्रीमती.अल्पना काळे आणि त्यांचे सहाय्यक श्री. चिराग दोशी यांनी पारंपारिक दिपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन केले.  

या कार्यशाळेतून आपल्याला सोस्पेसो आर्ट बद्दल मुलभूत माहिती मिळेल आणि पुढल्या वर्षी मार्गदर्शक श्रीमती. काळे यांना आमंत्रित करून याची पुढली पायरी आयोजित करण्यात येईल असे, श्री. परब यांनी सांगितले.

कला आणि संस्कृती खात्यातर्फे गोव्यात पहिल्यांदाच सोस्पेसो आर्टची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे असे श्रीमती. काळे यांनी आपल्या भाषणात सांगितले. सोस्पेसो हे सर्जनशील ३ डी आर्ट आणि हस्तकला आहे ज्यात सपाट नमुन्यांना गरम करून त्यांना आकार देऊन एक सुंदर ३ डी आर्टमध्ये सजवायचे असते असे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून गोव्यातील विविध भागातील एकूण ३० स्पर्धकांनी कार्यशाळेत सहभाग घेतला आहे. या कार्यशाळेचा समारोप १ फेब्रुवारी २०१९ रोजी होईल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुदन फडते यांनी केले आणि शेवटी आभार त्यांनीच मानले.

मा/वाप/एनएन/जॉआ/मागा/२०१९/१९

TOP