मुख्यमंत्र्यांकडून गोमंतकीयांना नववर्षाच्या शुभेच्छा

पणजी: ३१ डिसेंबर २०२३

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नववर्षानिमित्त, गोव्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक कुटुंबात सगळ्यांना चांगले आरोग्य, आनंद लाभो व सर्वांना आगामी वर्ष हर्ष उल्हासाचे जावो, अश्या शुभेच्छा मुख्यमंत्री आपल्या संदेशात देतात.

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जनतेला दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, कि “गेल्या वर्षभरात आपण काय केले, यावर मागे वळून विचार करण्याची ही वेळ आहे. ज्या वाईट गोष्टींचा आपल्याला अनुभव आला त्यातून धडा घेऊन, त्या सर्व कठोर भावना विसरून, पुढे पाऊल घालूया.”

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की “राज्य सरकार जनतेच्या कल्याणासाठी प्रभावीपणे विविध योजना राबवित आहे. आपला दृढनिश्चय कायम ठेवत, त्याला बळ देत आणि पुढील वर्षाची वाट पाहत, आपण गोव्याला आगामी वर्षात “स्वयंपूर्ण” बनवण्याच्या दिशेने मार्गक्रमण करूया.”

मुख्यमंत्री शेवटी आपल्या संदेशात म्हणतात, की “नव वर्षात लोकांनी नवीन आणि मोठ्या उद्दिष्टांसाठी प्रयत्न करावे. नवीन आशा घेऊन, नवीन वर्ष २०२४ चे स्वागत करण्यासाठी आपण सज्ज होऊ. सर्वांना हे नवीन वर्ष २०२४ सुखाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो, हीच प्रार्थना”.

Skip to content