मुख्यमंत्र्यांकडून राम नवमीच्या शुभेच्छा

पणजी, २० एप्रिल २०२१
चैत्र ३०, १९४३

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व गोमंतकीय जनतेला दि. २१ एप्रिल २०२१ रोजी होणार्‍या राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रभू रामचंद्रांच्या जयंती निमित्त देशातील सर्व हिंदू बांधवांद्वारे राम नवमीचा हा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि धार्मिक उत्कटतेने साजरा केला जातो. प्रभू रामचंद्र हे शांती, एकता आणि प्रामाणिकपणाचा अवतार आहेत. देशभरात झपाट्याने वाढत असलेल्या कोविड -१९ च्या सर्व सुरक्षा शिष्टाचारांचे पालन करून या वर्षी आपण हा उत्सव साजरा करूया असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

हा राम नवमी उत्सव विविध स्तरांवरील लोकांमधील एकता आणि प्रेम बळकट करो आणि सर्वांसाठी शांती आणि सुबत्ता घेऊन येवो असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

DI/NB/PN/GJG/RM/GD/2021/46

Skip to content