वीज पुरवठा खंडित

तारीख : २६ फेब्रुवारी २०२१

३३ केव्ही वाळपई -१ फिडरवर रविवार दि. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत दुरूस्तीचे काम करायचे असल्याने रेडेघाट भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

३३ केव्ही मोन्ते-१, मोन्ते-२ आणि सांकवाळ-१ फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने रविवार दि. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १०.०० ते १०.३० वाजेपर्यंत फातोर्डा सबस्टेशन, मोन्तेहिल सबस्टेशन आणि सांकवाळ सबस्टेशन भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, ३३ केव्ही मोन्ते-१, मोन्ते-२ फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने रविवार दि. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १०.३० ते ११.०० वाजेपर्यंत फातोर्डा सबस्टेशन, आणि मोन्तेहिल सबस्टेशन भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, ३३ केव्ही सिपला, मायक्रोलॅब आणि फिनोलेक्स फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० ते ११.३० वाजेपर्यंत वेर्णा औद्योगिक वसाहत भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच, ३३ केव्ही माजोर्डा -१ आणि मार्मागोवा-१ फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत माजोर्डा सबस्टेशन आणि वास्को भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, ११ केव्ही माजोर्डा फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळी ४.०० ते ४.३० पर्यंत सांकवाळ सबस्टेशन भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, ३३ केव्ही कोको कोला, लुपीन, पीडब्ल्यूडी, वॉटसन आणि बिर्ला फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १२.०० ते १२.३० पर्यंत वेर्णा औद्योगिक वसाहत भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच, ३३ केव्ही बिर्ला, ११ केव्ही औद्योगिक, ११ केव्ही हेराल्ड आणि ११ केव्ही वेर्णा फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १२.३० ते १.०० वाजेपर्यंत वेर्णा औद्योगिक वसाहत आणि वेर्णा भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, ११ केव्ही जॉर्डन आणि नागवे फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी ३.०० ते ३.३० पर्यंत वेर्णा औद्योगिक वसाहत आणि नागवे भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच, ११ केव्ही आयएफबी फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळी ३.३० ते ४.०० वाजेपर्यंत वेर्णा औद्योगिक वसाहत भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

असे माहिती आणि प्रसिद्धी खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/२२४

Skip to content