वीज पुरवठा खंडित

तारीख : २६ फेब्रुवारी २०२१

११ केव्ही श्रीस्थळ फिडर आणि ११ केव्ही आगोंद फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ५.०० वाजेपर्यंत चावडी, नगर्से, शेळेर, श्रीस्थळ ग्रामपंचायत, औद्योगिक वसाहत, आगोंद आणि खोला ग्रामपंचायत भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, ११ केव्ही सालेली फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत कुमारवाडा, अडवई पेडानी, गाडगीळ फार्म आणि वाघुरे भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच, ४०० केव्हीए टोंक, एसबीआय ट्रान्फॉर्मरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत एसबीआय कॉलनी क्वार्टर्स, आल्कॉन ईस्टेट कॉलनी, मॉडेल्स पॅराडाईज बिल्डींग आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, धाट फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत आजराकर फार्म(२५केव्हीए), डेअरी फार्म(१००केव्हीए) आणि साळगावकर(२५केव्हीए) भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

असे माहिती आणि प्रसिद्धी खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/२२३

Skip to content