राज्य निवडणूक आयोगाकडून कोविड-१९ रूग्णांसाठी मतदान व्यवस्था

तारीख : २६ फेब्रुवारी २०२१

आगामी ११ नगरपालिका आणि पणजी महानगरपालिका निवडणुकांमध्ये कोविड-१९ बाधित व्यक्तींसाठी राज्य निवडणूक आयोगाने विशेष व्यवस्था केली आहे. कोरोना बाधित व्यक्तींसाठी संध्याकाळी ४.०० ते ५.०० या वेळेत मतदान करण्यास आयोगाने मान्यता दिलेली आहे.

मतदानाच्यावेळी कोविड-१९ मार्गदर्शक तत्वे/मानक कार्य प्रणालीचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची खात्री आयोगाने दिली आहे.

११ नगरपालिका आणि पणजी महानगरपालिकेसाठी दि. २० मार्च २०२१ रोजी सकाळी ८.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत निवडणूक घेतली जाणार आहे.

असे माहिती आणि प्रसिद्धी खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/२२५

Skip to content