वीज पुरवठा खंडित

तारीख : २५ फेब्रुवारी २०२१

कुळे फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत भरीपवाडा (१००केव्हीए) फादर फार्म (१५०केव्हीए), आर. काणेकर (१००केव्हीए), शिंदे फार्म (१००केव्हीए) आणि वाकीकुलान (१००केव्हीए) भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, ११ केव्ही ठाणे फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत चरावणे आणि हिवरे भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच, ११ केव्ही गावडोंगरी आणि पाळोळे फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत पाळोळे, ओवरे, पाटणे, कोळंब, किंडले, तारीर, पणसुले, मस्तीमळ, गावडोंगरी ग्रामपंचायत आणि काणकोण आरोग्य केंद्र भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

असे माहिती आणि प्रसिद्धी खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/२१५

Skip to content