ग्रामपंचायत सचिव पदांसाठी २८ रोजी लेखी परिक्षा

ग्रामपंचायत सचिव पदांसाठी २८ रोजी लेखी परिक्षा
तारीख : २५ फेब्रुवारी २०२१

पंचायत सचिव पदांसाठी रविवार दि. २८ फेब्रुवारी २०२१ सकाळी १०.०० ते ११.३० पर्यंत उत्तर गोव्यातील खालील परिक्षा केंद्रांवर लेखी परिक्षा घेण्यात येतील.

१. सरकारी पॉलीटेक्निक, पणजी

२. डॉन बॉस्को हायस्कूल, पणजी

३. सेंट मायकल हायस्कूल, ताळगाव

४. रोझरी हायस्कूल, कुजिरा, बांबोळी

५. के. आर. हेडगेवार, कुजिरा, बांबोळी

६. मुष्टीफंड हायस्कूल कुजिरा, बांबोळी

उमेदवारांना मुलाखतीसाठी पत्रे पाठविण्यात आली आहेत. ज्या उमेदवारांना अजून पत्रे मिळालेली नाहीत त्यांनी दि. २६ फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारी २०२१ या दिवसांत सकाळी १०.०० ते १.०० आणि २.३० ते ५.०० यावेळेत ऑनलाईन अर्जाच्या पोचपावती प्रतीसह पंचायत संचालनालयाच्या कार्यालयातून आपली पत्रे घेऊन जावीत.

असे माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/२२०

Skip to content