दक्षिण गोवा कोविड -१९ योद्यांसाठी लसीकरण मोहीम

तारीख : २४ फेब्रुवारी २०२१

दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकार्‍यांनी दक्षिण गोवा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कोविड-१९ योद्यांसाठी 26 आणि 27 फेब्रुवारी 2021 रोजी लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे.

सासष्टी तालुक्यासाठी लसीकरण मडगाव येथील नवीन हॉस्पिसियो इस्पितळाच्या पहिल्या मजल्यावर लसीकरण केंद्र क्र. १ मध्ये तर मुरगांव तालुक्यासाठी चिखली येथील उपजिल्हा इस्पितळ लसीकरण केंद्र क्र. १, फोंडा येथे राजीव कलामंदिर येथे, केपे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात, काणकोण येथे सामाजिक आरोग्य केंद्रात, धारबांदोडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि सांगे येथील नगरपालिका सभागृहात लसीकरण कार्यक्रम होणार आहे.

सर्व केंद्रे सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत चालू राहणार असून कोविन पोर्टलवर आपले नाव नोंद केलेल्या सर्व कोविड योद्यांनी त्यांच्या सोईनुसार आपली ओळखपत्रे दाखवून लस घ्यावी असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.

असे माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/२१३

Skip to content