वीज पुरवठा खंडीत

तारीख : १९ फेब्रुवारी २०२१

३३ केव्ही मॉडर्न नॅस्ट आणि ताज सेट, दाभोळी फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २० फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत मे. मॉडर्न नॅस्ट आणि मे. ताज सेटच्या परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, ३३ केव्ही वाळपई १ आणि २ फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २०फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी३.०० वाजेपर्यंत वाळपई नगरपालीका परिसर, दाभोस जल प्रक्रिया प्लांट, म्हावशी, नगरगाव, सावेर्डे, भिरोंडा, खोतोडे, गुळेली आणि ठाणे ग्रामपंचायत क्षेत्र, पिसुर्ले, होंडा औद्योगिक वसाहतीतील ११ केव्ही आणि एलटी ग्राहकांना वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच, ११ केव्ही आयनॉक्स ट्रान्सफॉर्मरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २० फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत वेल्हो ट्रेड सेंटर, रिझवी सदन, वैद्य हॉस्पिटल, मार्केट संकूल, हॉटेल नेपच्यून डिलक्स आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

११ केव्ही सांगे फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २०फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी१२.३० वाजेपर्यंत सांगे, खैरीखात्ते, पागुणा, मुगोळी, मारांगण, कुयनामळ, कोष्टीमळ, बेंडवाडा चिखलमळ, तारीमळ, दांडो, पांनगळ आणि खरखातेघाटी भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

११ केव्ही होंडा फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २० फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी२.०० वाजेपर्यंत सालेली आणि बोंडवाडा परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.

११ केव्ही सांकवाळ औद्योगिक सब-स्टेशन फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.२१ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी१२.०० वाजेपर्यंत साकवाळ औद्योगिक वसाहतीतील ११ केव्ही आणि एलटी ग्राहकांना वीज पुरवठा केला जाणार नाही.

असे माहिती आणि प्रसिद्धी खात्याने कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१९१

Skip to content