मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला-२४ स्वातंत्र्यसैनिकांची मुले सरकारी सेवेत

तारीख : १७ फेब्रुवारी २०२१

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद यांनी दिलेले आश्वासन पाळत पहिल्या टप्प्यामध्ये २४ स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी सेवेत सामावून घेणार असल्याची घोषणा केली. यासाठी बुधवारी झालेल्या मंत्रीमडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला होता.

मंत्रीमंडळाने सुरूवातीला २४ स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सामावून घेण्यासाठी मंजूरी दिली असून उर्वरित २२३ मुलांना गोवा मानव संसाधन विकास महामंडळाद्वारे सेवेत घेतले जाईल आणि आवश्यकतेनुसार त्यांना सरकारी सेवेत सामावून घेतले जाईल असे यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आपल्याला सरकारी सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांनी गेल्या महिन्यात आमरण उपोषण चालविले होते.

विधानसभेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन २४ मार्च रोजी घेण्याचा निर्णय मंत्रीमंडळाद्वारे घेण्यात आला. “अर्थसंकल्पिय अधिवेशन २४ मार्च रोजी होणार असून ते बराच काळ चालू राहील” असे मुख्यमंत्री म्हणाले. परंतु, या अर्थसंकल्पाचा अजेंडा सर्व राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या बिझिनेस एडवायजरी कमिटीने(बीएसी) संमत करायचा बाकी आहे सेही ते म्हणाले.

मांडवीमधील कॅसीनोंच्या पुनर्वासाविषयी अद्याप ठराव झालेला नसल्याने त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचेही मंत्रीमंडळाने ठरविले आहे असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१८७

Skip to content