आरोग्य सेवा संचालनालयातर्फे नेत्र चिकित्सा शिबिरे

तारीख : १७ फेब्रुवारी २०२१

आरोग्य सेवा संचालनालयाने “सर्वांसाठी दृष्टी” या शिर्षकाखाली राज्यामध्ये मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन केले आहे.

रविंद्र भवन मडगाव येथे दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० पर्यंत नेत्र चिकित्सा शिबिर होणार आहे. मडगावचे आमदार तथा विरोधी पक्ष नेते श्री. दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार श्री. विजय सरदेसाई, रविंद्र भवन मडगांवचे अध्यक्ष श्री. दामोदर(दामू) नाईक हे यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कुडचडे, काकोडा येथील कम्युनिटी आरोग्य केंद्रामध्ये दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० पर्यंत नेत्र चिकित्सा शिबिर होणार असून वीजमंत्री श्री. निलेश काब्राल हे यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

वाळपई येथील बस स्टँड आणि कम्युनिटी हॉलमध्ये दि. २० फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० पर्यंत नेत्र चिकित्सा शिबिर होणार आहे. आरोग्यमंत्री श्री. विश्वजित राणे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

डिचोली येथील हिराबाई झांट्ये मेमोरीयल हॉलमध्ये दि. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १०.०० ते ११.३० आणि दुपारी ३.०० ते ४.३०पर्यंत नेत्र चिकित्सा शिबिर होणार असून सभापती आमदार राजेश पाटणेकर यांच्या हस्ते चष्म्यांचे वितरण केले जाईल.

तेलंगण, खोर्ली, म्हापसा येथील सारस्वत विद्यालय हायस्कूलमध्ये दि. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १०.०० ते ११.३० आणि दुपारी ३.०० ते ४.३० वाजेपर्यंत नेत्र चिकित्सा शिबिर होणार असून म्हापशाचे आमदार श्री. जोशूआ डिसोझा यांच्या हस्ते चष्म्यांचे वितरण केले जाणार आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१८६

Skip to content