रविंद्र भवन कुडचडे येथे शिवजयंती निमित्त नाट्यप्रयोग

तारीख : १७ फेब्रुवारी २०२१

शिवाजी महाराज जयंती प्रित्यर्थ रविंद्र भवन कुडचडेतर्फे दि. १८ आणि १९ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळी ७.०० वाजता दर्जेदार नाटकांचे आयोजन करण्यात आले आहे. ही नाटके रविंद्र भवनच्या मुख्य प्रेक्षागृहात सादर केली जातील.

गुरूवार दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी माहिती आणि प्रसिद्धी खाते, गोवा सरकार पुरस्कृत सार्वजनिक सरस्वती उत्सव मंडळ, गोळवाडा, कुंभारजुवे, गोवा निर्मित “सरनोबत” हे ऐतिहासिक नाटक सादर केले जाईल. या नाटकाचे लेखन रघुनाथ शांताराम चव्हाण यांचे असून श्री. निलेश गणेश फडते यांचे या नाटकाला दिग्दर्शन लाभले आहे.

शुक्रवार दि. १९ फेब्रुवारी रोजी राजीव गांधी कलामंदिर आयोजित पहिल्या ऐतिहासिक नाट्यस्पर्धेत चतुर्थ बक्षिस प्राप्त झालेले “करीन ती पूर्व” हे कै. विष्णू सूर्या वाघ पुनर्लिखित अजरामर ऐतिहासिक नाटक सादर केले जाणार आहे. हे नाटक “पंचम, म्हार्दोळ, फोंडा गोवा” या संस्थेची निर्मिती असून श्री. दिगंबर रामा नाईक यांचे दिग्दर्शन लाभलेले आहे. प्रकाश योजना श्री. अभय देसाई तर पार्श्वसंगीत श्री. पांडुरंग शिरोडकर यांचे असेल. यात नरेश तळवडकर,सौ. शर्मिला नाईक, सौ. सम्राज्ञी नाईक, परेश खेडेकर, नरेश नाईक, मनोज नाईक, गुरूदास नाईक, आनंद वाघुर्मेकर, राजेश प्यारेलाल यांच्यासह २३ कलाकारांच्या भुमिका आहेत.

कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन केले जाईल तसेच दोन्ही नाटकांसाठी सभागृह सेनिटाईज करण्यासह योग्य ती खबरदारी जाईल असे अध्यक्ष श्री. निलेश काब्राल, उपाध्यक्ष श्री. राजू नाईक, सदस्य सचिव श्री. अजय गावडे, आणि निमंत्रक श्री. सावंत देसाई व सर्वानंद सावंत देसाई यांच्यातर्फे कळविण्यात आले आहे.

वरील कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला असून नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून हा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन रविंद्र भवनतर्फे करण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१८५

Skip to content