सरकारी फार्ममधील फळझाडांची परत पावणी

तारीख : १६ फेब्रुवारी २०२१

पशूसंवर्धन आणि पशूवैद्यकीय सेवा संचालनालयातर्फे पशूखाद्य बीज उत्पादन फार्म, काले, सांगे येथील २० आंब्यांची झाडे आणि ६५ नारळाची झाडे तर सरकारी पशुसंवर्धन फार्म, धाट, मोले येथील ३० आंब्यांची आणि ६५ नारळाच्या झाडांची १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२४ या तीन वर्षांच्या काळासाठी फेर पावणी करण्यात येणार आहे. ही पावणी दि. ०३ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वाजता धाट, मोले येथील सरकारी पशुसंवर्धन फार्ममध्ये घेण्यात येणार आहे.

इच्छुकांना रविवार आणि सुट्टीचे दिवस सोडून इतर कामकाजाच्या दिवसांमध्ये सकाळी ९ ते ११ आणि दुपारी २.३० ते ५ या वेळेत झाडांची पाहणी करता येईल असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१८१

Skip to content