जीवनावश्यक वस्तूंचा दर

तारीख: १६ फेब्रुवारी २०२१

स्थानिक उकडा तांदूळ, बाहेरचा उकडा तांदूळ, सूपर फाईन सुरय तांदुळ, फाईन सुरय तांदूळ, सामान्य सुरय तांदूळ, उत्कृष्ठ गूळ, एस-३० जातीची साखर, बारशी तूरडाळ, मूगडाळ, उडीदडाळ, चणाडाळ, मसूरडाळ, मूग, काबूली चणा मोठा, सनफ्लावर तेल, नारळाचे तेल १ लिटर पॅकेट वनस्पती घी डालडा यांचा दर आठवडाभर स्थिर होता. वाटाण्यांचा भाव म्हापसा बाजारात रू. २०/- वाढला असला तरी इतर बाजारांमध्ये तो स्थिर होता.,

बटाटे, टोमॅटो आणि हिरव्या मिर्च्यांचा भावही सर्व बाजारांमध्ये स्थिर होता. कांद्याचा भाव पणजी आणि म्हापसा बाजारात अनुक्रमे प्रतिकिलो रू. ५/- ते १०/- आणि रू.१०/- असला तरी मडगाव बाजारात तो स्थिर होता. म्हापसा बाजारात हिरवा वाटाणा आणि कोबी यांचा भाव प्रतिकिलो रू. १०/-आणि रू. ५/- नी उतरला तर इतर ठिकाणी तो स्थिर होता.

१०० भरती, १२० भरती, १५० भरती आणि १८० भरतीच्या नारशांचे दर पणजी, मडगाव, आणि म्हापसा बाजारांमध्ये स्थिर होते असे माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१८२

Skip to content