गोवा राज्य संग्रहालयातर्फे संग्रहालय आठवड्याचे आयोजन

तारीख : १६ फेब्रुवारी २०२१

गोवा राज्य संग्रहालयातर्फे दि. १९ ते २६ फेब्रुवारी २०२१ दरम्यान संग्रहालय आठवड्याचे आयोजन करण्यात येणार आहे. संग्रहालय सचिव श्री. रवी धवन, आयएएस हे दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता आदिलशाह पॅलेस, पणजी येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत.

या कार्यक्रमाला बालभवनच्या अध्यक्ष डॉ. शितल नाईक या सन्माननीय पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याचे औचित्य साधून विभागातर्फे “दुधफळार” या विषयावर छायचित्र प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी आणि इतर लोकांनी उपस्थित रहावे असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१८०

Skip to content