वीज पुरवठा खंडीत

तारीख : १५ फेब्रुवारी २०२१

११ केव्ही सिटी फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.१६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बंदू क्रशर आणि अन्सोले भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, ११ केव्ही नार्वे फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत झांट्ये काजू फॅक्टरी, वरपाल, हातुर्ली, कोनाटी, मये तलाव, वायंगिणी, सावनवाडा, चिंचभाटवाडी, देऊसभाटवाडी, सेझा मायनिंग (एनएसपी), पीडब्ल्यूडी लामगाव आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

Skip to content