वार्तापत्र

तारीख : १५ फेब्रुवारी २०२१

गोवा स्टेट काऊन्सील फॉर सायन्स एन्ड टॅक्नोलॉजी (जीएससीएसटी) साळगांव, ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विविध विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी नोडल एजन्सी असल्याने ख्यातनाम वैज्ञानिक आणि नोबल विजेते सर सी.वी. रामन यांच्या रामन सिद्धांताच्या शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस (एनएसडी) साजरा करते.

त्याचप्रमाणे, राष्ट्रीय विज्ञान दिवस -२०२२(२८ फेब्रूवारी २०२२) राज्यभर साजरा करण्यासाठी चर्चासत्रे, प्रश्नमंजूषा, प्रदर्शने, व्याख्याने, रेडीओ टॉक शो इत्यादी आयोजित करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्था आणि विज्ञानाशी संबंधित संघटनांकडून मदत अनुदानासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

तसेच, राज्यात २२ डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यासाठी गणितविषयक प्रश्नमंजूषा, व्याख्याने, स्पर्धा इत्यादी आयोजित करण्यासाठी संबंधित संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. वरील विषयांवरील प्रस्ताव संबंधित मंत्रालायाकडून मंजूरी मिळाल्यानंतर मदत अनुदानासाठी निवडले जातील. सर्व प्रस्ताव दि ५ मार्च २०२१ पर्यंत सदस्य सचिव, गोवा स्टेट काऊन्सील फॉर सायन्स एन्ड टॅक्नोलॉजी, साळगांव सेमीनरीजवळ, साळगांव, बार्देस, गोवा. ४०३५११ या पत्त्यावर पाठवावेत.

अधिक माहितीसाठी प्रकल्प अन्वेषक श्री. संजीव आर. चोडणकर मो.क्र. 9284794220 किंवा समन्वयक श्री. फ्रान्सिस्को ल्युकास मो. क्र. 9850142936 यांच्याशी संपर्क साधावा असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात येत आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१७९

Skip to content