वीज पुरवठा खंडीत

तारीख : १२ फेब्रुवारी २०२१

११ केव्ही होंडा फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.१३ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत आयटीआय, गावकरवाडा, वडादेवनगर, होंडा, होंडा मार्केट (काणे) आणि कदंबा बसस्टँड डीटीसी भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, ११ केव्ही होंडा फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत सालेली आणि बोंडानवाडा भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच, ११ केव्ही जम्बो डीटीसी फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत मरड सांगोल्डा, दामोदर कोचरेकर कॉम्प्लेक्स, साईबाबा मंदिर, प्रकाश साळगावकर हाऊस, सुर्य कांबळी कारपेंटरी वर्कस आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, ११ केव्ही पीर्ण फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.१५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत आमठाणे, आमठाणे वॅली, भटाळे ऑईल मिल, धनगरवाडा, अडवलपाल, गावकरवाडा, खोतवायंगण, कोळमवाडा अडवलपाल, मेणकुरे मैदान, मुर्डावाडा, हॉटेल महिंद्रा, सावेरधाट उसप, वैगनहर क्रशर, मेणकुरे, धुमाशे, सावेरधाट भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१६६

Skip to content