गोवा स्वयंपूर्ण करण्यात यशस्वी होण्यासाठी १० कलमी मुद्दे – मुख्यमंत्री

तारीख : १२ फेब्रुवारी २०२१

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील सर्व नगरपालिकांसाठीच्या स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाचा मागोवा घेतला.

गोवा स्वयंपूर्ण करण्यात यशस्वी होण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम आखावा असे मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकार्‍यांना सांगितले. सर्वांसाठी निवारा या उद्दीष्टा अंतर्गत झोपडपट्टी भागाकडे जास्त लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. खर्‍या गरजवंत लोकांपर्यंत केंद्रीय किंवा राज्याच्या योजना पोहोचतात की नाही हे सुनिश्चित करावे असेही ते म्हणाले. सरकारने यासाठी लक्ष्य ठेवलेले आहे आणि डिसेंबर २०२१ पर्यंत त्याचा पाठपुरावा करून ते साध्य केले पाहिजे. नगरपालीकांच्या जमीनी, होर्डींग्स इत्यादींना काही समस्या आहे ज्या सोडविणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सर्वांसाठी शौचालय, वीज, पाणी पुरवठा आणि सर्वांसाठी घरकुल हे मुख्य मुद्दे प्रामुख्याने प्राधान्यक्रमाने सोडविले पाहिजेत ज्याशिवाय स्वयंपूर्ण गोवा चे लक्ष्य साधणे शक्य होणार नाही असेही त्यांनी सांगितले.

शहर विकास मंत्री श्री मिलिंद नाईक, मुख्य सचिव श्री. परिमल राय, आयएएस, शहर विकास सचिव डॉ. तारीक थॉमस,आयएएस, माहिती आणि प्रसिद्धी सचिव. श्री. संजय कुमार, आयएएस, जिपार्डचे संचालक श्री. मायकल डिसोझा, डीएमएचे संचालक श्री. गुरूदास पिळर्णकर, कामगार आयुक्त श्री. राजू गावस, उच्च शिक्षण संचालक श्री. प्रसाद लोलयेकर, जिपार्डच्या सहाय्यक संचालक श्रीमती सिमा फर्नांडीस हेही या बैठकीला उपस्थित होते.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१७३

Skip to content