वीज पुरवठा खंडीत

तारीख : ०९ फेब्रुवारी २०२१
माघ २०, १९४२

११ केव्ही वास्को-२ फिडरवर दुरूस्ती काम करायचे असल्याने दि.१० फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत दाबोळी, आसय डोंगरी, ग्रीन व्हेली भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही मालीम फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. १० फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बिठ्ठोण, विर्लोस, हळीवाडा, आरएनडी-स्लीपवे, मालीम, टुरीझम कॉम्प्लेक्स आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच, ओल्ड मरड डीटीसीवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. १० फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ४.०० वाजपर्यंत फुटबॉल ग्राऊंड, रंजिता बार, ओल्ड मरड, सिल्वर बॅल, पापाज स्टोर्स, साईबाबा मंदिर आणि सभोवतालच्या परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.

असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१५६

Skip to content