Home »News

गृह आधार योजनेअंतर्गत बँक खात्यात बदल

 

दि. २३ ऑक्टोबर २०१८

       कार्तिक १,१९४०

 

                 भारतीय रिजर्व बँकेच्या निर्देशानुसार म्हापसा अर्बन सहकारी बँकेत गृह आधार योजनेचे मासिक वेतन स्वीकारले जात नसल्याने या बँकेतील लाभार्थींच्या खात्यात मासिक वेतन जमा होऊ शकत नाही, असे महिला आणि बालविकास संचालनालयातर्फे कळविण्यात आले आहे.

          त्यामुळे म्हापसा अर्बन सहकारी बँकेत खाते असलेल्या सर्व गृह आधार योजनेच्या लाभार्थींनी इतर कोणतीही बँक निवडून बँकेचा तपशील त्वरित जीईएलकडे सादर करावा.

          तसेच लाभार्थींनी श्रम शक्ती भवन, पाटो पणजी येथील गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडे (जीईएल) सादर केलेल्या बँक खात्याशी त्यांचा आधार क्रमांक जोडावा अशी विनंती करण्यात आली आहे.

 

मा/वाप/टीएसएस/रना/रेधु/अगां/२०१८/१७०२

 

TOP