Home »News

पुष्पवर्षावाद्वारे कोरोना वॉरियर्सना मानवंदना

 

०३ मे २०२०

ज्येष्ठ १३, १९४२

 

कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी, डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचार्‍यांनी दिलेल्या नि:स्वार्थी सेवेच्या सन्मानार्थ गोवा मेडिकल कॉलेज, ईएसआय इस्पितळ, मडगाव व कॉटेज इस्पितळ, चिखली येथे नौदल आणि तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवर्षाव करण्यात आला व मिठाईचे वाटप करण्यात आले. वास्को पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनाही मिठाईचे वाटप करण्यात आले. याव्यतिरिक्त, आयएनएस हंसा येथे १५०० पुरुष व महिला नौसैनिकांनी एकत्र जमून मानवी साखळीद्वारे, कोरोना वॉरियर्सचे आभार मानणारा संदेश प्रदर्शित केला.

 

 

डीआय/एनबी/जेए/जेएस/२०२०/१९४३

TOP