Home »News

गोव्यात अडकलेल्या ६११७ पर्यटकांना सरकारने मायदेशी पाठविले

पणजी: ३ मे, २०२०

 

 

कोविड -१९ जागतिक महामारीच्या पाश्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे  राज्यात अडकून पडलेल्या विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी सुखरूपपणे पोहचविण्यासाठीगोवा सरकारनेसमन्वय साधला व त्यांची सोय केली.

विदेशी नागरिक शाखेचे (फॉरेनर्स ब्रान्च) पोलीस अधीक्षक श्री. बॉस्को जॉर्ज यांनी सांगितले की, २४ मार्च २०२० ते २६ एप्रिल २०२० दरम्यान विविध देशांतील ६११७ पर्यटकांना मायदेशी पाठविण्यात आले. यापैकी, २३३९ युकेचे नागरिक, ११७३ रशियाचे, ६९२ जर्मनीचे, २४० फ्रान्सचे आणि १५६ इटलीचे नागरिक होते.

संबंधित देशांच्या दूतावासाशी समन्वय साधून विमान प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आणि दाबोळी विमानतळावरून विमानांचे प्रस्थान होईपर्यंतगृह मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांनुसार सर्व शिष्टाचारांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

DI/NB/JA/AP/2020/1942

TOP