Home »News

शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम

पणजी, 2 मे 2020

शिक्षण संचालनालय, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ (एस.सी.ई.आर.टी) आणि गोवा समग्र शिक्षा (जीएसएस), अध्ययन फाऊंडेशन आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सीस (टीआयएसएस) हैद्राबाद यांच्या सहकार्याने राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयीन शिक्षकांसाठी इफेक्टीव प्लॅनिंग फॉर अचिवमेंट ऑफ लर्निंग आऊटकम्स या विषयावर चार दिवशीय  ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणार आहे.

हा कार्यक्रम शाळा प्रमुख आणि शिक्षकांना आभासी व्यासपीठ आणि शैक्षणिक प्रक्रियेमध्ये गुंतून राहून विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध असलेल्या सामग्रीतून समक्रमितपणे आणि असमक्रमितपणे शिकण्यास सहाय्य करण्यास मदत करेल. त्याचबरोबर शिक्षकांना अध्यापन दिवसांची संख्या, सारांश मुल्यांकन, कार्यक्रम आणि उपक्रम यांप्रमाणे त्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नियोजन करण्यास मदत करेल. शिक्षकांना उपलब्ध खुल्या शिक्षण संसाधनांच्या निवडीवर आधारित युनिट्स आणि धड्यांचे आणि माहिती वितरणाच्या पद्धतीचे नियोजन करण्यासाठी मदत करेल आणि शाळा प्रमुख आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मागोवा घेऊन शिकण्याचे निकाल सुधारत आहेत याची खात्री करण्यासाठीही मदत करेल.

हा कार्यक्रम दोन टप्प्यांमध्ये घेतला जाईल. पहिल्या टप्प्यात, दि. 5 ते 8 मे 2020 दरम्यान 406 मास्टर ट्रेनर्सद्वारे शिक्षक आणि शाळा प्रमुखांना (प्राथमिक, माध्यामिक आणि उच्चमाध्यमिक शाळा) प्रशिक्षण देण्यात येईल. डीआयईटी आणि बीआरसीसी च्या शिक्षकांना टीआयएसएस आणि अध्ययन फाऊंडेशनमधील तज्ञांद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर, दि. 13 ते 16 मे 2020 दरम्यान हे मास्टर ट्रेनर्स शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देतील.

शालेय शिक्षणाच्या सर्व थरांवरील साधारण 10500 शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण देण्याची योजना करण्यात आली आहे.

DI/NB/PN/SAG/2020/1942

 

 

 

TOP