Home »News

जागरूकता आणि जबाबदारीच्या भावनेने महामारीविरुद्ध लढा*
- प्रकाश नाईक, माहिती अधिकारी, माहिती आणि प्रसिद्धी खाते.
       गोवा आता कोरोना मुक्त राज्य झाले आहे आणि हे लक्षात घेत राज्य सरकारने लॉकडाऊन कालावधीत लागू करण्यात आलेले निर्बंध शिथील केले आहेत. निर्बंध सोपे केल्याने राज्यातील लोकांना राज्यात ये जा करण्यासाठी त्यांचा उदरनिर्वाह करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नोवेल करोना हा एक प्राणघातक व्हायरस आहे आणि या साथीच्या रोगामुळे उभ्दवलेले संकट अद्याप कमी झाले नाही. शेजारच्या राज्यांसह देशभरातही अनेक प्रकरणांमध्ये वाढ झाली असून ही बाब चिंताजनक आहे.
ही सद्यपरिस्थिती लक्षात घेता गोव्यातील लोकांनी सतर्क रहावे आणि व्हायरसचा संसर्ग न होण्यासाठी स्वत:ला दूर ठेवण्यासाठी जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे. आनंदी आणि शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी हे कुटुंबातील सदस्यांसह स्वत: चे संरक्षण सुनिश्चित करेल.
करोना व्हायरस ह्या साथीच्या रोगा संबंधी प्रसार आणि जनजागृती करून सामान्य जनतेत प्रतिबंधात्मक उपायांसह व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी,त्या विरूध्द लढा देण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना सुरू केल्या.
अशा वेळी जेव्हा जग कोविड- १९ पासून त्रस्त आहे, गोव्यातील जनतेला मात्र सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत  दिलासा मिळाला आहे कारण राज्याची गणना देशातील काही करोना मुक्त राज्यांच्या यादीत झाली आहे.
नि:संशयपणे, या यशाचे श्रेय मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात संपूर्ण सरकारी यंत्रणेने सुरू केलेल्या प्रयत्नांना दिले पाहिजे आणि गोव्यातील जनतेने केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीत, देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान लोकांकडून संयम ठेवण्यात आला, सामाजिक अंतर कायम ठेवणे आणि फेस मास्क वापरणे या संदर्भात गृह व्यवहार मत्रालयाच्या (एमएचए) सध्या अस्तित्वात असलेले निकषांचे पालन करण्यात आले.
सुरवातीला जेव्हा कोविड-१९ साथीचा रोग सर्व देशभर पसरला तेव्हा लोकांच्या मनात भिती निर्माण झाली होती, विशेष:त या नोवल वायरसमुळे आतापर्यंत जगभरातील हजारो लोकांचा जीव गेला असल्याने, संक्रमित रुग्णांना बरे करण्यासाठी योग्य वैद्यकीय उपचारांची उपलब्धता नसल्याने भिती वाटत होती. आज संपूर्ण जगात मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत जाणे ही मानवतेसाठी चिंतेची बाब आहे कारण साथीचा हा आजार अद्याप कमी झाला नाही.
गोव्यातील लॉकडाऊन लागू झाल्यानंतर, कोविड-१९ विरूध्द लढा देण्यासाठी राज्य सरकारच्या पूरक प्रयत्नांना लोकांकडून मिळालेला संपूर्ण पाठिंबा आणि सहकार्य अभूतपूर्व आहे. सरकारी स्वयं स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी,भागधारक, स्वयंसेवा संस्था आणि जनसेवक ज्येष्ठ-स्तरावरील अधिकारी ते खालच्या रॅंकचे कर्मचारी या महामरी विरूध्द लढा देण्यासाठी पुढे आले. गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक लोकांनी मुख्यमंत्री मदत निधीस हातभार लावला.
कोरोना व्हायरसच्या विरोधात खबरदारीचा उपाय म्हणून गोव्यात राज्य सरकारने कोविड-१९ पासून प्रतिबंध करण्यासाठी आणि लढण्यासाठी अनेक सल्लागार, आदेश, परिपत्रके जारी केली आहेत जी जगभरात इंटरनॅशमल टूरिस्ट लोकल म्हणून ओळखली जातात. गोव्यातील जाती, धर्म, पक्ष यांच्याशी संबंधित नसलेल्या सर्व स्तरातील लोकांनी या रोगाविरुध्द सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शविला. लोकांनी सामाजिक अंतरांच्या निकषांचे, तोंडाला मास्क घालणे आणि वेळोवेळी एमएचएने जारी केलेल्या इतर मार्गदर्शक सूचनांचे काटेकरोपणे पालन केले आहे. यावरून असे स्पष्ट होते की लोकांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केलेले नाही.
 या महामारीविरुध्द लढताना महत्वाची भूमिका बजाविणारे फ्रंट लाईन योध्दा जसे डॉक्टर, परिचारीका, पेरा-मेडीकरल कर्मचारी, पोलिस अधिकारी आणि इतर सर्वांचे कौतुक केले. गोव्यात अनोळखी लोकं येऊ नयेत म्हणून गोवा सरकाराने सर्व आठ प्रवेश केंद्रे सील केली आहेत. त्याद्वारे लोकांच्या गरजां, औषधे, हेल्थ केअर सुविधा आणि अन्य वस्तू पुरविण्यासाठी त्वरित पावले उचचली गेली. संपूर्ण राज्यात सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी सॅनिटाईझेशन ड्राईव्ह व्यतिरिक्त सरकारने इतर उपाययोजनांचेही चालीला लावल्या जसे सरकारी कर्मचारी आणि सामान्य लोकांचे तापमान तपासण्यासाठी थर्मल गन्सची खरेदी इत्यादी. तसेच देशातील अन्य भागात अडकलेल्या सीफेर्रसला परत गोव्यात आणण्यासाठी यश मिळाले तसेच इतर ठिकाणी अडकलेलेया उर्वरीत सीफेर्रसना आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तसेच अडकलेल्या विदेशी पर्यटकांना शेजारच्या देशात पोहोचविण्याचीही सुविधा केली.
निष्काळजीपणे राहू नका कारण हा रोग कोणत्याही वेळी वाढू शकतो. त्याकरीता भवष्यात आम्ही खूप सावधगिरी आणि जागरूक राहिले पाहिजे. अशा प्रचलित परिस्थतीत आम्ही सावधानतेने आणि जबाबदारीने वागले पाहिजे.

TOP