Home »News

राज्य कार्यकारी समितीतर्फे कोव्हीड-19 च्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

पणजी: 30 एप्रिल 2020

मुख्य सचिव श्री. परिमल राय, आय.ए.एस यांच्या अध्यक्षतेखाली 28 एप्रिल 2020 रोजी वनभवन येथे राज्य कार्यकारी समितीची बैठक पार पडली. यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञानचे प्रधान सचिव श्री. आय.ए.एस, पुनित गोयल, वाहतूक सचिव आय.ए.एस श्री. एस. के भंडारी, महसूल सचिव, एसईसी आणि एसडीएमएचे सदस्य, श्री. संजय कुमार उपस्थित होते.

आरोग्य सचिवांनी 03 एप्रिल 2020 नंतर कोव्हीड-19 चा एकही रूग्ण आढळला नसल्याचे सांगितले आहे. गोव्यात कोव्हीड-19 चे सात रूग्ण आढळले होते. आता ते सातही रूग्ण बरे झालेले आहेत. बरे झाल्यानंतर या रूग्णांना कोव्हीड इस्पितळाबाहेरील कॉरेनटाईन सुविधामध्ये ठेवण्यात आले. गेल्या 24 तासात कोव्हीड-19 च्या 123 चाचण्या घेतल्या गेल्या आहे.(घरोघरी सर्व्हेक्षणा केलेल्या संशयित व्यक्तींच्या चाचण्या केल्या होत्या.) त्यामधील सर्वांचे अहवाल हे नकारत्मक आले आहेत. राज्य कार्यकारी समितीनी सांगितले आहे की अद्यापही गोवा राज्य हे सामुदायिक संक्रमणला सामोरे गेलेले नाही आहे.   

वैद्यकीय आपत्कालिन विभाग आणि महामारीच्या पार्श्वभूमीवर असलेली अन्य प्रकरणासाठी  आंतरराज्य येण्या-जाण्यासाठी आवश्यक त्या मान्यता दिल्या जाव्यात याबाबत सदर समितीची चर्चा केली. यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आणि आय.टी सचिवांनी अर्जांची योग्य ती छाननी करून योग्य निर्णय घेण्याविषयी समितीने सांगितले आहे.

          बार्जवर काम करणारे व्यक्तींना गोव्यात यायचे असल्याने त्यांनी आपल्या चाचण्या करण्याविषयीची तयारी दर्शविली आहे. तथापि त्यांच्या सर्व चाचण्या झाल्यानंतरही त्यांनी बार्जवर राहण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. बार्ज ओनर असोसिएशने यांनी अशी विचारणा पोर्ट सचिवांकडे केली आहे. हा मुद्दा पोर्ट सचिवांनी राज्य कार्यकारी समितीमध्ये मांडला त्याविषयी समितीने पारदर्शकतेने या गोष्टीवर काम करण्यास त्यांना सांगितले आहे.

पाच कोरेनटाईन सुविधामध्ये एकुण 41 व्यक्तींना ठेवलेले आहे. आणि त्यासाठी रोज या सुविधाला भेट देत असल्याचे कोरेनटाईन सुविधासाठी असलेले नोडेल अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

आरोग्य खात्याने अनेक कियॉस्क स्थापित केले आहे. आरोग्य खाते सीमेवरील ज्या व्यक्तींची चाचणी करणार त्यांची ते प्राधान्यक्रमाद्वारे यादी करणार आहेत.योग्य तो प्रोटोकॉल यासाठी पाळला जाईल. यासाठी सीमेवरील चाचणी नमूने हे दिवसाला दोन किंवा अधिक वेळा चाचणी क्रेंद्रात पाठवू नये असे सांगितले आहे. ज्याद्वारे एम्बूलन्स सेवेच्या ट्रीपवर मर्यादा येईल. सीमेवरील चाचणी नमुने घेतलेल्या व्यक्तींचा अहवाल येईपर्यंत त्यांनी सीमेवरच राहणे बंधनकारक असेल असे राज्य कार्यकारी समितीने सांगितले आहे.

पीसीई (सार्वजनिक बांधकाम खाते) यांनी 119 चालू असलेले कामकाजाचे परत नव्याने सुरवात केली आहे आणि यासाठी 4615 कामगार यामध्ये जुंपलेले आहे. पाणी पुरवठा संदर्भात पाडोसे येथील जुना पंप हा दुरूस्त झाला असून तो पुर्वीसारखा कार्यरत झाला आहे. उद्यापर्यंत पाणी पुरवठा होईल.तसेच नवीन पंप तांत्रिक मनुष्यबळाच्या सहाय्याने लवकरच बसविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

61 आयटी कंपनीना मान्यता दिल्या आहेत आणि आयटी कंपनी सुरू होण्यासाठी 490 कर्मचार्‍यांना ट्रानसिट पास दिल्याचे संचालक आयटीने कळविले आहे.

एकुण 58,000 विदेशी लोक देशसोडून गेले आहे. त्यातील 6447 विदेशी गोव्याच्या विमानतळावरून प्रयाण केले आहे. युके (सुमारे 42%) आणि अन्य तीन देश रशिया, जर्मनी आणि फिनलँड सुमारे 80% विदेशींनी गोवा विमातळावरून प्रयाण केल्याचे (विदेशी) नोडल अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

अबकारी खात्याने 193 रिटेल लिकर दुकाने/ बार, व्होलसेलरसह जप्त केले आहेत. पेडणे नंतर सालसेत, सत्तरी, बारदेज या तालुक्यात दारूची अतिविक्री होत आहे. त्याचबरोबर लिकर निर्मात्यांनी 3.91 लाख लिटरचे हँन्ड सॅनिटायजरचे उत्पादन केले असल्याचे अबकारी  आयुक्तानी सांगितले आहे.

गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांमध्ये पीडीएस रेशन लिफ्ट केले आहे. तसेच वर्तमानपत्रात आलेल्या बातमीत ज्या गरजू व्यक्तींना धान्य मिळालेले नाही या सर्वांची खात्याने पडताळणी केली आहे. यासाठी खात्याचे पथक त्या गरजू व्यक्तींकडे जाऊन एफपीएसद्वारे धान्य मिळण्याची निश्चती केली आहे व त्यांना धान्याच्या तुटवटा होणार नसल्याचीही शाश्वती केली असल्याचे नागरी पुरवठा सचिवांनी कळविले आहे.

कालच्या दरापेक्षा आज डाळीचा भाव हा वधारला आहे. तसेच फोंडा म्युनसिपल कांऊसिल म्युनसिपलच्या विविध कामासाठी 14 स्थलांतरित कामगार जुंपले आहेत असे सी आर गर्ग जिल्हा निरीक्षकांनी कळविले आहे.

नोंदणी कार्यालये चालू झाली आहे आणि खात्याने 17 दस्ताऐवज आणि अनेक लग्नाच्याही नोंदणी झालेल्या आहे असे कायदा सचिवांनी कळविले आहे. राज्य कार्यकारी समितीने सामाजिक अंतर आणि अन्य सुरक्षा दंडकाचे पालन करण्यास सांगितले आहे.

सीमेवरील चेक पोस्टवरील वीज वारंवार खंडित होत असल्याने इनव्हरटर बसविण्यात आले असल्याचे जिल्हा ऑबर्सरवर श्री. केशव कुमार यांनी कळविले आहे.

नागरी क्षेत्रामध्ये सुमारे 50 टक्के स्डँन्डलोन दुकाने खुली असल्याचे डीएमए यांनी कळविले आहे. तसेच 60 टक्के दुकानेही ग्रामीण भागात खुली असल्याचे पंचायत संचालकांनी सांगितले आहे.

सरकारी कर्मचारी आणि आरोग्य सुरक्षा कर्मचारार्‍यांसाठी 150 बसेस कार्यरत होते वाहतूक संचालक यांनी कळविले आहे. सदर समितीच्या सल्ल्यानुसार कंदब बसेस रॅशनेलायज केलेले असल्याचे वाहतुक सचिवांनी सांगितले आहे.

राज्य कार्यकारी समितीने सांगितले प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वावरतान मास्क घातले पाहिजे. मास्क असल्यास पेट्रोल भेटेल, मास्क असल्यास रेशन भेटेल या तत्त्वाने राज्यात मास्कची प्रभावी अंमलबजावणी होईल. नागरी पुरवठा सचिव आणि डीआयपीला या तत्त्वाचे पालन करण्याविषयी सदर समितीने सांगितले आहे.

पोलीस खात्याने 1000 लोकांना मास्क न घातल्याने दंड ठोठावला आहे असे आयजीपीने सांगितले आहे. दैनंदिन पातळीवर दंडाचा आकडा देण्यात यावा तसेच सार्वजिनक ठिकाणी थुंकणार्‍यावरही कारवाई केली जावे असे समितीनी आयजीपीला सांगितले आहे.

जर एमएचएच्या आदेशाप्रमाणे जर कुठलीही व्यक्ती नियमांचे पालन  करीत नसल्यास त्या व्यक्तीवर डिसासटर मँनेजमँट, 2005, कलम 51 ते 60 च्या अंतर्गत तसेच आयपीसीच्या 188 या कलमा अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जावी असे समितीने बैठकीत उपस्थित असलेल्या सांगितले आहे.

डीआय/एनबी/ पीएन/ एपी/ जेएस/ 2020/ 1938

 

 

TOP