Home »News

डीएफइएस यांनी हाती घेतलेल्या सॅनिटायजेशन कार्याचा अहवाल

पणजी: 30 एप्रिल 2020

10 वैशाख, 1942

कोव्हीड-19 या महामारीच्या पार्श्वभूमीवर अग्निशामक आणि आपत्कालिन सेवा यांनी गोवा राज्यामध्ये सॅनिटायजेशन केले. 

संबधित नगपालिका किंवा ग्राम पंचायत आणि म्युनिसिपल प्रशासनाचे संचालनालयाच्या शिफारसीनुसार किंवा पंचायत संचालनालय यांच्या द्वारे क्यूआरएफटीच्या सहाय्याने आणि हाय प्रेशर हाऊस रील हाऊस यांनी 0.5%काँनसँट्रेट सोडियम हायपोक्लोराईट सोल्युशन वापरून सर्व सार्वजनिक ठिकाणी जसे बस स्थानक आणि बस स्टॉप, कमुन्यिटी सभागृह, बाजाराचे ठिकाणे,पंचायत कार्यालये, मंदिरांची पंटागणे, शासकीय कार्यालये, सचिवालय संकुल, मंत्रालय ब्लॉक, चर्चचे आवार, मासळी बाजार, गोवा मेडिकल कॉलेजमधील कोव्हीड वॉर्ड, गोवा डेंटल कॉलेज, आरोग्य क्रेंद्रे, रीव्हर नेव्हिगेशन खात्याचे फेरी बोटी, सी स्कॅम मरिटाईम केंद्र, टॅक्सी स्टँण्ड, विद्युत खाते, पोलीस स्टेशन/चौकी, सीमा पोस्ट क्षेत्र, खेळ संकुले, बँका, गोवा डेअरी, रविंद्र भवन इत्यादी ठिकाणी सॅनिटायजेशन केले आहे.

कोव्हड-19 या महामारी दरम्यान सेवा देणारे वैद्यकीय कर्मचारी व अन्य कर्मचारी पणजी, पर्वरी, म्हापसा पेडणे, डिचोली, वाळपई,फोंडा, मडगाव, काणकोण येथील कंदब बसद्वारे प्रवास करतात त्या सर्व बसेसचे सॅनिटायझेशन केले आहे. तसेच गोवा डेंटल कॉलेज, गोवा मेडिकल कॉलेज आणि नर्सिंग इन्सटिट्यूट मध्ये काम करणार्‍या कर्मचारार्‍यांसाठी ज्या बसेस वापरल्या जातात त्यांचेही सॅनिटायझेशन केले आहे.

अग्निशामक आणि आपत्कालिन सेवांनी आपले दैनंदिन कामकाज सांभाळून 28 एप्रिल 2020 पर्यंत 2192 ठिकाणे सॅनिटायजेशन केले आहे. तसेच त्यांनी पेडणे येथे 282, म्हापसा येथे 364, पिळर्ण येथे 144, वास्को येथे 44, जुने गोवा येथे 85, डिचोली येथे 131, वाळपई येथे 123, कुंडई येथे 43, फोंडा येथे 59, वेर्णा येथे 144, मडगाव येथे 537, कुडचडे येथे  104, काणकोण येथे 91 आणि अग्निशामक सेवांच्या मुख्यालयात 41 या ठिकाणी सॅनिटायजेशन केल्याचा त्यांचा अहवाल आहे.

कोव्हीड-19  या महामारीच्या दरम्यान अग्निशामक आणि आपत्कालिन सेवेला डेक्कन फाईन कॅमिकल यांनी 10% काँनसँट्रेट सोडियम हायपोक्लोराईट सोल्युशनवर 1400 लिटर आणि पीपई ज्यामध्ये ग्लोव्हज, गॉगल्स प्रदान केले आहे.तसेच वेदांत (सेसा गोवा) (डिस्पोसेबल)कॅमिकल सूट प्रदान केले आहे.

अग्निशामक आणि आपत्कालिन सेवेनी 60 पुन:वापर करता येणारे पीपीई घेतलेले आहे. कोव्हीड-19 च्या अनुषंगाने सॅनिटायझेशन करताना अग्निशामक कर्मचारार्‍यांच्या सुरक्षा हेतूत्यांच्या सर्व शरीराला सुरक्षा देणारे सुट, नायट्रेल ग्लोव्हज, गॉगल्स प्रदान केले आहे. सामान्य लोकांनी सॅनटियजेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. सदर उपक्रमअग्निशामक आणि आपत्कालिन सेवे मार्फत दैनंदिन पातळीवर चालू आहे. तसेच पुढेही प्राधिकार्‍यांच्या मागणीनुसारही सेवा दिली जाईल.

डीआय/एनबी/पीएन/जेएस/सीएन/2020/1937

 


TOP