Home »News

हिट व्हेव अलर्टः करावे आणि करू नये

पणजी २९ एप्रिल २०२०

वैशाख , १९४२

मे ते १४ मे २०२० दरम्यान गोवा राज्यात हिट व्हेवची शक्यता असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. अशी परिस्थिती आली तर ती हाताळण्यासाठी सरकारने लाईन विभागांना अधिक जागरुकता आणि सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. उपाययोजना जागेवर आणण्यासाठी सर्व लाईन विभागांना हिट व्हेव २०२० सल्लागारानुसार हिट व्हेव सज्जता तयार करण्यासाठी विनंती केली आहे.

 

या काळात लोकांनी तहान लागली नाही तरी भरपूर पाणी प्यावे, ओआरएस (ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन) वापरावे, स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी घरगुती पेय जसे लस्सी, तोरणी (निवळ), लिंबू पाणी, ताक इत्यादींचा प्यावे. हलके, हलक्या रंगांचे, विसकळ, कोटन कपडे घालावे. डोके झाकावेः कपडा, टोपी किंवा छत्री वापरावी.

 

कार्यक्षेत्रात कर्मचार्‍यांना पिण्याचे थंड पाणी देण्याची विनंती केली आहे. कामगारांनी थेट सुर्यप्रकाशात जाणे टाळावे, दिवसाची कठोर कामे थंड वेळी ठरवावी, बाह्य कामांच्या रेस्ट ब्रेकरची फ्रिक्वंसी आणि उंची वाढली जाऊ शकते, गरोदर कर्मचार्‍यांवर अधिक लक्ष दिले जावे.

 

लोकांनी शक्य होईल तितके घरातच थांबावे, घरे थंड ठेवावी, पडदे, शटर किवां सनशेड वापरावे आणि रात्री खिडक्या उघडाव्यात, खालच्या मजल्यावर थांबण्याचा प्रयत्न करावा. फॅन्स, डेम क्लोथिंग आणि वारंवार थंड पाण्याने आंघोळ करावी. जर तुम्हाला चक्कर आल्यासारखे किंवा आजारी असल्याचे वाटत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे संपर्क करावा. जनावरांना सावलीत ठेवावे आणि त्यांना प्यायला भरपूर पाणी द्यावे.

 

TOP