Home »News

डीजी शिपिंगची खलाशांना परवानगी

पणजी:२७ एप्रिल, २०२०

                                                         

 

डीजी शिपिंगतर्फे ६० पैकी ५७ खलाशांना परवानगी देण्यात आली होती. प्रलंबित असलेल्या ३ खलाशांना परवानगी मिळविण्याच्या  गोवा सरकारच्या प्रयत्नांना यश आले आहे. उद्या त्यांचे गोव्यात आगमन होत आहे. त्यांच्यासाठी गोवा सरकार सज्ज आहे. कर्णिकावरील खलाशांची अजून कोविड-१९ चाचणी होणे बाकी आहे, आणि त्यानंतर त्यांना डीजी शिपिंगची परवानगी मिळेल. तसेच, त्यांनी सर्व तपशिलासह गोवा सरकारकडे अर्ज करणे बाकी आहे. त्यांना लवकरात लवकर परत आणण्याचे गोवा सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

TOP