Home »News

दक्षिण गोव्यात रेस्टोरंट्स बंद ठेवण्याचा दंडाधिकार्‍यांचा आदेश

पणजी २६ एप्रिल २०२०

वैशाख ४, १९४१

देशातील सद्या कोविड-१९ महामारीमुळे उद्भवलेल्या आरोग्य आपत्कालिन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि ही महामारी सर्वत्र पसरू नये म्हणून दक्षिण गोवा, जिल्हा दंडाधिकार्‍यांनी दक्षिण गोव्यात खालील गोष्टी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

रेस्टोरंट, चहाची दुकाने/पानपट्ट्या, इतर खाद्यपदार्थ्यांची दुकाने/ खाद्य केंद्र  (धाबा, गाडे), स्ट्रिट फूड विक्रेते, समुद्रावरील शॅक, अन्य खाद्यापदार्थांचे प्रकार, व्यायामशाळा, सिनेमा थियेटर, सर्व सार्वजनिक आणि खासगी सभागृह, सार्वजनिक स्विमींग पूल, दोन्ही सँड अलोन आणि हॉटेल्स/रिजोर्टमध्ये इत्यादी, कसिनो, स्पा आणि मसाज पार्लर/सलून, रिव्हर क्रुझ, नाईट क्लब, दक्षिण गोवा जिल्ह्यातील सर्व परवाना जागेवर दारु विक्री व सेवन, मल्टीप्लेक्स, मार्केट/मार्केट संकूल, शॉपिं मॉल्स.

तथापि, रेस्टोरंट आणि इतर खाद्य केंद्रांना फक्त होम-डिलीवरी/टेक अवेसाठी काम सुरु ठेवण्यासाठी परवानगी दिली जाईल.

कोणत्याही व्यक्तीने जर वरील आदेशाचे पालन केले नाही तर भारतीय दंड संहीता अंतर्गत कलम १८८ अन्वये दंड देण्यात येईल.

डीआय/एनबी/पीएन/एसजीएन/डीएसके/जीडी/2020/1920

 

 

 

TOP