Home »News

मुख्यमंत्र्यांनी आसिलो हॉस्पिटलमील रुग्णांची घेतली भेट

पणजी, २४ एप्रिल २०२०

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आज म्हापसा येथील जिल्हा आसिलो हॉस्पिलटात भेट दिली.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भेटी दरम्यान भारतातील काही भागात वैद्यकीय कर्मचारी आणि अग्रभागी कोविड-१९ च्या योध्द्यांबरोबर होणार्‍या हल्ल्याचा निषेध केला. अशा हल्ल्यांविरोधात केंद्र सरकारने बनविलेले कठोर कायदे असे हल्ले रोखण्यासाठी काळाची गरज होती. या महामारीविरुध्द लढण्याचे उदाहरण तयार करणार्‍या कोरोना योध्दा तसेच वैद्यकीय आणि पेरा-मेडीकल कर्मचार्‍यांचे आम्ही समर्थन केले पाहिजे असे त्यांनी पुढे म्हटले.

मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटलमध्ये अर्धा दिवस घालवताना सांगितले की, आपण जरी राज्याचा मुख्यमंत्री असलो तरी व्यवसायाने आपण एक आयुर्वेदीक डॉक्टर आहे, आणि मी २००८ नंतर आसिलो हॉस्पिटलमधील ओपीडीला भेट दिली आहे. मी माझा वाढदिवस कोरोना योध्दांसाठी समर्पित करतो. मुख्यमंत्र्यांनी डॉ. एडविन गोम्स यांच्या नेतृत्वाखाली कोविड महामारी विरुध्द लढण्यासाठी काम करणार्‍या समर्थन कर्मचार्‍यासह संपूर्ण टीमचे कौतुक केले.

डीआय/एनबी/पीएन/एपी/एसजी/2020/1915 

TOP