Home »News

गोवा सरकाने मास्क वापरणे केले बंधनकारक
पणजी:
24 एप्रिल 2020

गोवा एपिडेमिक डिसिस, कोव्हीड-19 नियामक, 2020 च्या अंतर्गत राज्यात कोव्हीड-19 या महामारीचा प्रसार रोखण्यासाठी सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या जागी तसेच रस्त्यावर, इस्पितळात, काम करीत असलेल्या साईटसवर इत्यादीं जागेवर जाताना सर्व व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक असेल असे गोवा सरकाने निर्देशित केले आहे.
जर एखादी व्यक्ती मास्कचा वापर करत नसल्यास आय.पी.सी,1860 च्या कायद्यामधील कलम 188 च्या अंतर्गत दोषी व्यक्तीस 100 रूपयांचा दंड भरावा लागेल. जर दोषी व्यक्तीने दंड न भरल्यास सदर कलमाप्रमाणे त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
डीआय/एनबी/पीएन/एपी/एसएस/2020/1994

TOP