Home »News

३० एप्रिल २०२० रोजी पीजी समुपदेशानाची पहिली फेरी
पणजी, २४ एप्रिल २०२०
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलने पीजी समुपदेनाच्या एमडी, एमएस, डिप्लोमा जागांसाठी पात्र असणार्‍या सर्व उमेदवारांना ईमेलव्दारे ऑनलाईन, समुपदेशाची पध्दत निवड करण्यासाठी हमीपत्र सादर करण्याची विनंती केली आहे.
गोवा राज्य कोट्याच्या पीजी समुपदेशाच्या एमडी, एसएस आणि डिप्लोमा जागांसाठी पहिली फेरी ३० एप्रिल २०२० रोजी होणार आहे. राज्य कोट्याच्या पीजी समुपदेशाच्या एमडी, एसएस आणि डिप्लोमा जागांसाठी पहिली फेरी २० एप्रिल ते ४ मे २०२० दरम्यान होणार होती. पण कोविड-१९ महामारीमुळे नोटरी सेवेत अनेक अडचणी येत होत्या हे लक्षात घेऊन गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील प्राधिकारी ज्यादिवशी राज्य मोप अप फेरी असेल त्यादिवशी नोटरी सेवेची व्यवस्था करतील जेणेकरून एआयक्यू आणि राज्य कोट्यातील विद्यार्थ्यांना नोटरी सेवेचा लाभ घेता येईल.
डीआय/एनबी/पीएन/एसएजी/2020/1913

TOP