Home »News

गोमॅको पदव्योत्तर अभ्यासक्रमासाठी 50 टक्के राज्य सुधारित कोटा उपलब्ध करणारः

पहिली फेरी 30 एप्रिल रोजी

पणजी, 23 एप्रिल 2020

वैशाख 3, 1942

 

कोविड-19 च्या उद्रेकामुळे देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी एमडी/एमएस/डिप्लोमापदव्योत्तर अभ्यासक्रमांसाठी 50 टक्के सुधारित राज्य कोटा समुपदेशन आणि प्रवेशासाठी उपलब्ध करण्याचे ठरविल्याची माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने दिली आहे.

अंतिम गुणवत्ता यादीचे प्रदर्शनः- दि. 27 एप्रिल 2020 रोजी (संध्या.5.00 पर्यंत) गोमेकॉ च्या सूचना फलक व संकेतस्थळावर.

राज्य समुपदेशन आणि प्रवेशाची प्रत्यक्ष/ऑनलाईन प्रथम फेरीः दि. 30 एप्रिल 2020.श्रेणी ए मेरीट क्र.01 ते 100 आणि इ साठी सकाळचे सत्र 10.00 ते दुपारी 1.00 पर्यंत.श्रेणी ए मेरीट क्र.100 ते 209 आणि बी,सी, डी आणि इ साठी संध्याकाळचे सत्र 3.00 ते 6.00 पर्यंत.

प्रवेशाचे ठिकाणः नवीन प्रेक्षागृह आणि परिक्षागृह, मुख्य कॉलेज इमारतीच्या मागे, गोवा वैद्यकीय महाविद्यालय संकुल, बांबोळी.ऑनलाईन समुपदेशनआणि प्रवेशः-विडीओ कॉन्फरन्सींगद्वारे वेबएक्स प्लॅटफॉर्म वापरून केला जाईल.

ज्या उमेदवारांनी समुपदेशन आणि प्रवेशासाठी ऑनलाईन प्रकार निवडला आहे आणि तसे गोमेकॉच्या शैक्षणिक विभागाला ई-मेलद्वारे कळविले आहे त्यांना बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अधिकृतता कोडसह ईमेल पाठविली जाईल. प्रवेश मिळालेल्या उमेदवारांनी ताबडतोब नेफ्ट (एनईएफटी) द्वारे प्रवेश शुल्क भरले पाहिजे. शुल्काविषयीची सविस्तर माहिती गोमेकॉ च्या संकेतस्थळावरील पीजी एनईईटी टेब वरून मिळविता येईल.प्रवेश शुल्क भरल्यानंतर उमेदवाराला प्रवेश शुल्क भरल्याची पावती आणि इतर आवश्यक दस्तऐवजांबरोबर दाखल होण्याच्या पत्राची स्कॅन केलेली प्रत ईमेलद्वारे सादर करावी लागेल. ऑनलाईन दिलेला प्रवेश हा तात्पुरता असेल आणि आवश्यक दस्तऐवजांची प्रत्यक्ष पूर्तता केल्यानंतरच प्रवेश दिल्याचे पुष्टीकरण केले जाईल.

गोव्याच्या हद्दीत राहणार्‍या उमेदवारांनी शक्यतो प्रत्यक्ष समुपदेशन आणि प्रवेशासाठी प्राधान्य द्यावे आणि अनिवार्यपणे हमीपत्र सादर करावे.

पदव्योत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याच्या दिवशीच आवश्यक ते प्रवेशशुल्क भरण्याची उमेदवाराची पुरेशी तयारी असणे आवश्यक आहे.

समुपदेशनाचा प्रकार आणि वाहतूक पास कळविण्याच्या हमीपत्राचा (पुनःप्रस्तुत करणे आवश्यक) फॉर्म गोमेकॉ संकेतस्थळावरील अकॅडमीक टेब खाली डाऊनलोड फॉर्मस् शीर्षका वरून डाऊनलोड करता येईल.

DI/NB/JA/SN/PP/LT/2020/1907

TOP