Home »News

स्वयंरोजगार लोकांसाठी व बांधकाम कामासाठी परवाने

२२ एप्रिल, २०२०

वैशाख २, १९४२

 

 

सर्व गट विकास अधिकार्‍‍यांना माहिती देण्यात आली आहे की गोवा राज्य कार्यकारी समितीने (एसईसी) पंचायत सचिवांना गृह मंत्रालयाने (एमएचए) जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार इलेक्ट्रीशियन, आयटी दुरूस्ती, प्लंबर्स, मोटार-मेकॅनिक, सुतार अशा विविध सेवा पुरविणार्‍या स्वयंरोजगार व्यक्तींना अधिकृत परवाना देण्यास सांगितले आहे.

वरील परवान्यामध्ये एमएचएच्या सामाजिक अंतराच्या आणि इतर निर्देशांच्या निकषांचे काटेकोरपणे पालन करून वरीलप्रमाणे सेवा प्रदान करण्यासाठी स्वयंरोजगार करणार्‍या व्यवसायाच्या संदर्भात ट्रान्झिट परमिट देणे आणि कार्य सूरू करणे इतकेच समाविष्ट आहे.

खासगी बांधकाम परवान्यांच्या संदर्भात मालक/ बिल्डर/ विकसक संबंधित ग्रामपंचायतीची परवानगी घेतील. बांधकाम/ पुनर्बांधणीच्या कामांसाठी परवानगी व कामगार/ संबंधित व्यक्तीसाठी प्रवासी परवानगी संबंधित ग्रामपंचायत सचिवांकडून देण्यात येतील.

मान्सूनपूर्व कामांच्या संदर्भात संबंधित व्यक्ती ग्रामपंचायत सचिवांकडे अर्ज करू शकेल, जो कामगारांना ट्रान्झिट पास देईल.

ग्रामपंचायत सचिवांना मालकांकडून अर्ज मिळाल्यानंतर, एमएचएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार क्रशर पुन्हा सुरू करण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. बांधकाम क्रियाकलापांच्या संदर्भात वस्तूंच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र परवान्याची आवश्यकता नाही कारण मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व वस्तू वाहतुकीस परवानगी दिली आहे.

कामाची परवानगी/ बांधकाम परवानगी/ ट्रान्झिट परवाने, सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी फेस मास्क घालणे यासह एमएचएच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये समाविष्ट कोविड-१९ व्यवस्थापन मधील सर्व राष्ट्रीय निर्देशांच्या पूर्ततेच्या अधीन असतील. कामाच्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान सर्व लोक सामाजिक अंतर सुनिश्चित करतील. कामाच्या ठिकाणी पाळीच्या दरम्यान एक तासाचा अंतर असेल आणि सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी कर्मचार्‍यांच्या लंच ब्रेक मध्ये योग्य नियोजन केले जाईल. सर्व संस्था/ व्यक्ती त्यांच्या कामाची ठिकाणे नियमितपणे सेनिटाईझ करतील. जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रा बाहेरून येणार्‍या कामगारांसाठी (राज्याबाहेरून नाही) सार्वजनिक परिवहन व्यवस्थेवर अवलंबून न राहता विशेष परिवहन सुविधेची व्यवस्था केली जाईल. या वाहनांना केवळ ३०-४० टक्के प्रवासी सह काम करण्याची परवानगी दिली जावी. कामाच्या ठिकाणी प्रवेश करणारी सर्व वाहने आणि यंत्रसामग्री अनिवार्यपणे स्प्रेद्वारे निर्जेतुकीकरण करावी. साईटवर अनावश्यक अभ्यागतांवर संपूर्ण बंदी असावी.

म्हणून सर्व गट विकास अधिकार्‍यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत सचिवांना परवानगी असलेल्या कामांच्या संदर्भात अर्ज मिळाल्यावर अशा प्रकारच्या परवानगी/ परवाने देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ग्रामपंचायत सचिवांनी अशा सर्व परवाने/ परवानगीची नोंद ठेवावी व त्यासंबंधीची सॅाफ्ट कॉपी प्रत संबंधित गट विकास अधिकार्‍यामार्फत पंचायत संचालनालयाला सादर करवी.

डीआय/एनबी/पीएन/जेएस/डीके/2020/1905

TOP