Home »News

मत्स्यव्यवसाय विभागातर्फे ब्लू रेव्होल्यूशन लाभार्थ्यांना मासे विक्रीसाठी मदत
 
गोवा सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाने ब्लू रेव्होल्यूशन एकात्मिक विकास आणि मत्स्यव्यवसाय व्यवस्थापनावरील केंद्रीय क्षेत्र योजने अंतर्गत सन २०१६-१७ मध्ये “आईस बॉक्ससह मोटारसायकल खरेदीसाठी आर्थिक सहाय्य” ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत उत्तर गोव्यात 28 युनिट आणि दक्षिण गोव्यात 11 युनिट अशी एकूण ३९ युनिट्सना आर्थिक मदत केली गेली. सद्या संपूर्ण राज्य लॉकडाऊन असल्यामुळे, विभागाने ३९ लाभार्थ्यांना तसेच  स्वयंसहाय गटांतर्फे चालविल्या जाणाऱ्या 8 मोबाइल फिश स्टॉलच्या आधारे विविध गावात जावून मासे विकण्याची संधी दिली.


TOP