मे महिन्यासाठीचा रेशन कोटा
पणजी- १८ एप्रिल २०२०
रेशकार्डधारकांसाठी आणि राज्यातील लाभार्थ्यांसाठी नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य घरगुती (एएवाय आणि पीएचएच), टाईड ओवर (टीओ),अन्नपूर्णा (एएनपी) आणि कल्याण संस्था योजना अन्वये मे २०२० च्या कोट्याबद्दल माहिती दिली आहे.
अंत्योदय अन्न योजना (एएवाय) कार्ड वर्गासाठी ३ रुपये प्रती किलोने ३५ किलो तांदूळ प्रदान केले जातील तर प्राधान्य घरगुती अंतर्गत लाभार्त्यांना ३ रुपये प्रती किलोने ५ किलो तांदूळ देण्यात येतील.
त्याच प्रमाणे दारीद्र्य रेषेच्या वरील (एपील) ८ किलो तांदूळ प्रती कार्ड १२.५० रु. आणि ४ किलो गहू प्रती कार्ड १० रू किलो दराने वाटप केले जाईल.अन्नपूर्ण कार्ड वर्गासाठी १० किलो तांदूळ विनाशुल्क देण्यात येईल.
तसेच रहिवाश्यांसाठी एकाला १५ किलो तांदूळ रु ६.१५ प्रती किलो आणि १५ किलो गहू रुपये ४.८० प्रति किलो दराने कल्याण संस्था योजनेंतर्गत वाटप केले जाईल.
स्वस्त धान्य दुकानदारांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांचा कोटा त्यांनी त्वरीत न्यावा आणि त्यांनी त्यांचा राहिलेला कोटा ३० एप्रिल २०२० किंवा त्यापूर्वी न्यावा. कोटा नेण्यासाठी मुदतवाड दिली जाणार नाही. रेशनकार्डधारकांनी मे,२०२० चा हक्काचा कोटा स्वस्त धान्य दुकानातून घेणे आवश्यक आहे.