Home »News

व्हॉट्सऍपद्वारे  मीटर रिडींग

पणजी, १७ एप्रिल २०२०

                                                                              चैत्र, २८, १९४२

दि. १० एप्रिल २०२० च्या थकबाकी देशा अंतर्गत जेईआरसी च्या मार्गदर्शक तत्वांनुसार ग्राहकांना त्यांच्या मीटरचे रिडींग व्हॉट्सऍप किंवा एसएमएस द्वारे देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यादृष्टीने खात्याने (+91)7972980575 हा व्हॉट्सऍप विकसित केला आहे.  या नंबरवर  गोवा राज्यात इन्स्टोलेशन  असलेले सर्व ग्राहक ज्यामध्ये केडब्ल्यूएच आधारित मीटर एलसीडी डिस्प्लेवरील आकडे दिसणारा आपल्या मीटर रिडींगचा स्कॅन/फोटो घालू शकतात. स्कॅनवर मीटरचा तपशीलही असणे आवश्यक आहे. ग्राहकाने सीए नंबर आणि बिलवर असलेले नाव आणि पत्ता स्कॅनबरोबर देणेही गरजेचे आहे. ग्राहकांनी नंतरच्या महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आठवड्यात वर वर्णन केल्याप्रमाणे मीटर रिडींग दिले पाहिजे. खात्याची अधिकारीणी तपासणी केल्यानंतर बिल देण्यावर विचार करील.

DI/NB/PN/DSK/SSP/2020/1876

 

TOP