Home »News

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीचा ५०% राज्य कोटा जीएमसी जाहीर करणार
एप्रिल १७, २०२०
चैत्र २८, १९४२

कोविड-१९ जागतिक महामारीच्या उद्रेकामुळे देशात लागू असलेल्या
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयातर्फे (जीएमसी) असे कळविण्यात
आले आहे की, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठीच्या पदव्युत्तर एमडी/एमएस/पदविका
अभ्यासक्रमांसाठी ५०% राज्य कोटासाठी समुपदेशन तथा प्रवेशासाठीचे अंशीय वेळापत्रक
जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी १६-०४-२०२०
रोजी जीएमसीच्या सूचना फलकावर (नोटीस बोर्ड) व संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल.
तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील त्रुटींच्या स्वीकृतीसाठी २०-०४-२०२० रोजी दु. १२.०० वा.
पर्यंत ही अंतिम तारीख असेल. अंतिम गुणवत्ता यादी २२-०४-२०२० रोजी (सायं. ५.००
वा. पर्यंत) जीएमसीच्या सूचना फलकावर (नोटीस बोर्ड) व संकेतस्थळावर उपलब्ध केली
जाईल. ऑनलाईन राज्य समुपदेशन व प्रवेशाची पहिली फेरी २७ व २८-०४-२०२० रोजी
(दु. २.३० वा. पासून) घेतली जाईल. मूळ कागदपत्रांचे सादरीकरण व अभ्यासक्रमासाठीचा
प्रवेश हे सक्षम प्राधिकरणाच्या निर्देशांनुसार होईल.

TOP