गोवा राज्य इनोव्हेशन परिषदेचा जीवन बचाव उपक्रम
पणजी, एप्रिल 16, 2020
चैत्र 27, 1942
गोवा राज्य इनोव्हेशन परिषदेने 3 डी-प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत प्रभावी आणि कमी किमतीच्या एफ 4 फेस शील्ड तयार केल्या आहेत. सदर सेल्फ-फिटिंग फेस शील्ड डॉ. के. बी. हेडगेवार स्कूल यांनी अटल टिंकरिंग लॅबच्या सहकार्याने तयार केले आहेत. सदर शील्ड पारंपारिक फेस मास्कच्या तुलनेत बरेच आर्थिक आणि वापरायला सोयीस्कर ठरणारे आहेत.
या एफ 4 फेस शील्डमध्ये एक एर्गोनोमिक डिझाइन आहे जे अत्यंत हलके आहेत जेणेकरून एखाद्या व्यक्तीची कोणतीही गैरसोय न होता ती व्यक्ती काही तासांसाठी ते वापरू शकेल. सफाई कामगार, आरोग्य सेवा इत्यादी आवश्यक सेवांमध्ये व्यस्त असलेल्या व्यक्तींसाठी, कमी खर्चात, पुन्हा वापरता येण्याजोगा मास्क जो घरात निर्जंतुकीकरण केला जाऊ शकतो व तो कोरोना विषाणूंविरूद्ध त्यांना प्रभावी सरंक्षण देऊ शकतो.
परिषदेने अलीकडेच गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाला एफ 4 फेस शील्डची बॅच प्रदान केली आहे.
डीआय/एनबी/जेए/पीपी/वीजी/2020/1860