Home »News


जीसीईटी परीक्षा २०२० स्थगित

पणजी - १६ एप्रिल २०२०.

                               चैत्र २७, १९४२

तांत्रिक शिक्षण केंद्रीकृत प्रवेश विभाग संचालनालयातर्फे कोविड-१९ महामारीचा विचार करता कळविण्यात आले की, जीसीईटी-२०२० परीक्षा ०५ मे २०२० आणि ६ मे २०२० दरम्यान घेण्यात येणार होती ती स्थगित करून जून २०२० किंवा त्यानंतर घेण्यात येणार आहे.

हे जेईई आणि एनईईटी तारखांच्या घोषणा तसेच इतर कोणत्याही अडथळ्यांच्या अधीन आहे, जीसीईटी-२०२० च्या परीक्षेच्या अचूक तारखा परीक्षा घेण्याच्या १० दिवस अगोदर निच्छित केली जाईल.

प्रॅास्पेक्टसमध्ये अधिसूचित केलेल्या इतर सर्व प्रवेश संबंधित उपक्रमांचे वेळापत्रक सुधारित केले जाईल आणि त्याची वेळेवर अधिसूचना केली जाईल.

डीआय/एनबी/पीपी/व्हीजी/2020/1860

TOP